BREAKING – कोर्टाचा निकाल आला… उद्धव ठाकरे हरले..!

0
184

मुंबई -१७/४/२३

मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे.

त्यामुळे २३६ एवजी २२७ प्रभाग कायम राहणार आहेत ठाकरे सरकारच्या नेतृवातील महाविकास आघाडी सरकारने वार्डसंख्या वाढवून घेतली होती.

त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने तत्कालीन ठाकरे सरकारचा हा निर्णय रद्द करीत २२७ प्रभाग रचना ठेवली होती. याविरोधात ठाकरे गटाकडून राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.

मात्र न्यायालयाने २२७ प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निकाल देत पेडणेकर यांची याचिका फेटाळून लावली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

17423 1 1

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचना करण्यात आली होती. यावेळी पालिकेच्या प्रभागांची संख्या वाढवून ती २२७ वरुन २३६ करण्यात आली होती.

मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकारने मविआ सरकारच्या काळातील ही प्रभागरचना रद्द केली आणि २२७ प्रभागांची जुनी प्रभागरचना कायम केली.

या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करीत याचिका दाखल केली होती.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

यावेळी उच्च न्यायालयाच्या न्या.सुनील शुकरे आणि न्या.एम.डब्लू.चांदवाणी खंडपीठाने पेडणेकर यांची याचिका फेटाळून लावली.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने लागू केलेली जूनीच प्रभागरचना आता कायम राहणार असून मविआ सरकारच्या काळात प्रभागरचना बदलून २३६ प्रभागांएवजी २२७ प्रभाग असणार आहेत.

मुंबई महापालिका वार्ड रचनेसंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावत २२७ प्रभाग कायम ठेवल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here