नंदुरबार -३/६/२३
श्रद्धा वालकर खून प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा दिल्लीतील या घटनेने सारा देश हादरला..
सोळा वर्षीय साक्षी या नामक तरुणीचा काही धर्मांध शक्तींनी स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग केला आणि लव्ह जेहादच्या नावाखाली ही तरुणी नाहक बळी ठरली
ही प्रकरण कायमस्वरूपी डोकं वर काढू पाहत आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यात साधारणपणे हिंदू धर्मातील विविध समाजाच्या मुली आणि त्यांचं शोषण या माध्यमातून केलं जातंय
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पुन्हा एकदा घडल्याने समाजमन सुन्न झालं
या प्रकारातून पुन्हा एकदा क्रूर हत्या या बालिकेची करण्यात आली त्यामुळे सर्व जनमानसात संतापाची लाट उसळली आहे
अजून अशा किती निष्पाप अल्पवयीन तरुणी आणि बालिका या लव्ह जिहादच्या नावाखाली या काही धर्मांध शक्तींच्या बळी ठरतील असा सवाल उपस्थित होतोय
देशात महिलांचे स्वातंत्र्य कायम आहे काय स्वातंत्र्य अबाधित आहे काय? सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊन पोहोचलाय.
लव्ह जेहाद विरोधी कायदा लवकरात लवकर अमलात आणावा आणि अशा आरोपींवर कठोर शिक्षा या माध्यमातून व्हावी अशी मागणीचे निवेदन नुकताच तळोदा शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी उपविभागीय अधिकारी तळोदा यांना दिले
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
केंद्रीय गृह खातं आणि राज्य गृह खात यांना या माध्यमातून निवेदनातून माहिती पोहोचवण्यात आल्याचं एमडीटीव्हीशी बोलताना विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त केलं..
येत्या काळात अशा घटनांमध्ये वाढ होत राहिली तर हिंदू धर्मातील विविध समाजातील मुलींसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.. त्यामुळे वेळीच अशा शक्तींना आणि या प्रकरणात सहभागी तरुणांना कायदेशीर बडगा दाखवण्याची आता वेळ आली आहे
निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजय सोनवणे यांच्यासह पदाधिकारी राजेंद्र पाडवी ऋषिकेश बारगळ, सचिन भोई संतोष झोहरी, मयूर भोई सीमा भोई , लता भोई रत्नाकलाल,राकेश भोई, संतोष वानखेडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या बातमीच्या माध्यमातून साऱ्या भारतीय समाजातील विशेषतः हिंदू समाजातील तरुणींना आम्ही जनहितार्थ आवाहन करीत आहोत की यासारख्या शक्तींच्या बळी पडू नका आणि स्वतःचे आयुष्य उध्वस्त करू नका, अशा संशयित तरुणांची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस स्थानकांना द्या आणि माध्यमांशी बोला, पुढच्या काळात एखाद्या बहिणीचे आयुष्य वाचवण्यात आपलं योगदान महत्त्वाचे ठरेल अशी आम्हाला खात्री आहे.. एक चुकीचा निर्णय आपल्या आयुष्याचा धागा तोडेल
आणि सारं होत्याचं नव्हतं होईल
त्यामुळे सावध भगिनींनो!
या बातमीसाठी तळोद्याहून नितीन गरुड तालुका प्रतिनिधी तळोदा एम डी टी व्ही न्यूज..