18 जुलै रोजी करणार रास्ता रोको आंदोलन : आमदार आमशा पाडवींचा इशारा
अक्कलकुवा/ नंदुरबार 15/7/23
अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथे घरकुल घोटाळ्यात मोठं घबाड निघणार.. आदिवासी लाभार्थींना त्यांच्या मूळ लाभापासून वंचित ठेवत अपात्र व्यक्तींची नावे पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात आली.. रामपूर येथील मूळ आदिवासी लाभार्थींची नावे मंजूर घरकुलचा लाभ हा इतरांच्या बँक खात्यात दिला गेला.. ही बाब निदर्शनास आणून देखील त्यांच्यावर अद्याप संशयित आरोपींवर कारवाई झाली नाही.. या संपूर्ण प्रक्रियेत दोषी ठरलेले तत्कालीन सरपंच ग्रामसेवक ,गटविकास अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वरदहस्त कोणाचा? त्यांना या कारवाईतून दूर ठेवण्यात आल्याचे उघड झाले .. सुमारे तीन वर्षाच्या कार्यकाळात लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थींपैकी चार लाभार्थींचा तर नुकताच मृत्यू झालाय.. ग्रामविकास विभागास ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही या आरोपींच्या पाठीमागे कोण उभे आहे, हा विभाग कोणती ठोस कारवाई न होता किंवा कागदी घोडे नाचवत आहे ही बाब निषेधार्थ आहे..
हे हि वाचा: https://mdtvnews.in/breaking-ajit-pawar-to-become-chief-minister-rauts-claim/
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे संपूर्ण घोटाळ्यात अप्रत्यक्षरीत्या समर्थन देत असल्यचं उघड झालं.. येत्या सात दिवसात या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार आमशा पाडवी यांनी प्रशासनाला दिलाय..
वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 18 जुलै रोजी अक्कलकवत तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता मयताचे वारसदार, वंचित लाभार्थी यांच्यासोबत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं या निवेदनात म्हंटलय.. यावेळी तहसीलदार रामजी राठोड यांना निवेदन देण्यात आले.. आमदारांसह यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी ,तालुकाप्रमुख मगन वसावे, युवती सेना जिल्हाप्रमुख मालती वळवी, आनंद वसावे पदाधिकारी ,कार्यकर्ते, लाभार्थी व वारसदार उपस्थित होते..
अखेर पाणी मुरतय कुठे? मूळ लाभार्थ्यांना बाजूला करून अपात्र लाभार्थ्यांना कागदावर दाखवून घरकुल योजनेचा लाभ लाटण्याचा प्रकार या घोटाळ्यातून स्पष्ट होतोय.. या प्रकरणाचा तपास होईपर्यंत आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत या लाभार्थ्यांच्या पाठीशी एमडी टीव्ही न्यूज चॅनल पाठपुरावा करत राहणार..
शुभम भंसाली ,अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार