शिरपूर/धुळे-२३ /६/२३
ACB:बिरसा मुंडा कृषी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या हप्त्याच्या बिलाची रक्कम १ लाख ३१ हजार रुपये खात्यावर जमा झाले. त्याच्या मोबदल्यात ८ हजारांची लाच घेतांना शिरपूर पंचायत समितीचे कृषी विभागातील विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर भगवान पाटील यांना धुळे लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदार यांची आईच्या नावे मौजे वाकपाडा येथे असलेल्या शेतजमीनीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे राबविल्या जाणार्या बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी अर्ज केला होता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्याप्रमाणे विहीर मंजूर झाली. सदर विहिरीचे खोदकाम व बांधकाम सुरु केल्यानंतर वेळोवेळी झालेल्या कामाची पंचायत समिती कृषी विभागाकडून पहाणी होवून पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली. त्यानंतर विहिरीचे उर्वरीत राहिलेले काम पूर्ण करुन त्या झालेल्या कामाचे अनुदान बिलाबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार कृषि विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे गेले असता तुझ्या आईच्या नावावर असलेल्या विहिरीच्या दुसर्या हप्त्याचे बिलाचे काम केले आहे. १ लाख ३१ हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली…
त्या मोबदल्यात दरमहा १० हजार रुपये द्यावे लागतील असे पाटील यांनी सांगितले. लाचेची मागणी केल्यामुळे तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीरीची पडताळणी केल्यानंतर दि.२२ जून रोजी विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांना शिरपूर शहरातील हॉटेल ग्यानमाई येथे तक्रारदाराकडून आठ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
राज जाधव ,शिरपूर तालुका प्रतिनिधी,एम डि टी व्ही..