बी आर एस च्या कार्यकर्त्यांनी वाचवले ट्रक ड्रायव्हरचे प्राण..

0
220

चोपडा -10/6/23

ही घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा निमगव्हाण रस्त्यावर
व्हीआयपी विटांचा ट्रक क्रमांक एम एच 40 सीडी 5327 उत्तराखंड कडून राजकोटला रवाना झाला होता
या रस्त्यावर अचानक ट्रक पलटी झाला
भंडारा येथील ड्रायव्हर रॉबिन मिश्रा राहणार साकोली जिल्हा भंडारा यात गंभीर जखमी झाले
अपघात घडल्यानंतर मदतीचा हात देण्याऐवजी अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली
मात्र या ट्रक ड्रायव्हरच्या मदतीला वेले तालुका चोपडा येथील उपसरपंच आणि बी आर एस कार्यकर्ते दीपक पाटील धावून आले
रुग्णालयातील ॲम्बुलन्स ला फोन लावून त्यांनी रुग्णालयात त्या ड्रायव्हरला दाखल केलं
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरू झालेत
दीपक पाटील नेहमीच जनसेवेच्या माध्यमातून अडीअडचणीच्या काळात मदतीला धावत असतात
याचा प्रत्यय आला या महामार्गावर

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांनी या घटनेबाबत भंडारा बी आर एस चे माजी आमदार यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली
आणि त्या ड्रायव्हरच्या घरापर्यंत निरोप पाठवण्यात त्यांना यश आलं
संकटाच्या काळात जो मदतीला धावतो तो खरा देवदूत आणि हा देवदूत दीपक पाटील यांच्या रूपाने पाहायला मिळाला
विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब लोकांना मिळवून देण्यात त्यांचा कायम पुढाकार पाहायला मिळतो
अशा जनसेवेला धावणाऱ्या दीपक पाटील यांच्या कार्याला एमडी टीव्ही न्यूज चा सलाम
त्यांच्या समावेत बी आर एस चे कार्यकर्ते म्हणून कृष्णा पाटील विशाल सैंदाणे या मित्रांची त्यांना साथ लाभली
आरटीओ इन्स्पेक्टर दीपक ढाकणे यांच्या सचिन राठोड चालक हेमंत माळी यांनी देखील मदत केली..
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज, जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here