बुलढाणा -२५/७/२३
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय विभाग, बुलढाणा (आरटीओ) विभागात दलालांचा सुळसुळाट झालाय.. गाडी नावावर करणे, लायसन्स काढणे, किंवा नवीन गाडी पासिंग करणे याकरिता सही मारणाऱ्या अधिकाऱ्यांचे रेटकार्ड ठरले आहेत .. .. एका चारचाकी वाहनसाठी 500 तर दुचाकीसाठी 300 रु मोजावे लागतात .. . तर किती सह्या झाल्या किती रक्कम घ्यायची यासाठी अधिकाऱ्यांचे रिमार्क ठरले आहेत ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यामधे कोणता अधिकारी वाहनानुसर गोल राऊंड तर कोणता अधिकारी तीन टिक अशी खूण करतो… त्या नुसार किती सह्या झाल्या, किती रक्कम झाली याचा हिशोब लागतो..त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही.. दलालामार्फत गेले तर नागरिकांची कामे तात्काळ होतात नाहीतर कामे होत नाही अशी ओरड आहे. सदर प्रकार एका दलालासोबत बोलताना उघडकीस आला.. प्रत्येक कामासाठी साहेब पैसे घेतात.. असे म्हणणे आहे…ह्या प्रकाराकडे वरिष्ठ अनभिज्ञ आहे की त्यांच्या मुकसंमतीने होत आहे का? याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी होत आहे.
पुरूषोत्तम कौसकार, बुलढाणा प्रतिनिधि,एम डी टी व्ही न्यूज ..