शहाद्यात बेकरीवर चोरट्यांचा डल्ला ; १ लाखाची चोरी

0
669

नंदुरबार :- शहादा शहरातील बसस्थानका समोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका बेकरीत पहाटे चार ते पाचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दुकान फोडून एक लाख रुपयांची रोकड चोरी केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघकीस आला असून याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहादा शहरातील बसस्थानकासमोरील अय्यंगार बेंगलोर बेकरीत अज्ञात चोरट्यांनी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या शटरला तोडण्याच्या प्रयत्न केला. मात्र ते न तुटल्यानंतर त्यांनी बाथरूमच्या वरील खिडकीची जाळी तोडत दोन चोरट्यांनी आत प्रवेश करून बेकरीमध्ये इलेक्ट्रिक बिल भरण्याची रक्कम व दोन दिवसाच्या ग्राहकांच्या गोळा झालेला पैसा असा एकूण १ लाख रुपये रोख चोरून नेली. या बेकरीत सकाळी काम करायला आलेल्या कर्मचाऱ्यांना गल्ला व त्याच्या जवळील कपाट अस्ताव्यस्त दिसून आले. संपूर्ण बेकरीची पाहणी केली असता मागील बाजूस असलेले शटर उचकवण्याच्या प्रयत्न केलेला दिसून आला. तसेच बेकरीतील बाथरूमच्या वरील खिडकीची जाळी तोडलेली दिसल्याने त्यांनी बेकरीचे चालक सागर शिवकुमार शेट्टीगिरे यांना सारा प्रकार सांगितला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

त्यांनी तात्काळ पोलिसांना घडलेली घटना कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. दुकानातील ५०० रुपयांच्या १०० नोटा, २०० रुपयांच्या १०० नोटा, १०० रुपयांच्या १०० नोटा, ५० रुपयांच्या ४०० नोटा असा एक लाखाची रोकड चोरून नेली आहे. चोरट्यांनी दुकानातील सी.सी.टी.व्हींची तोडफोड केली असून चोरट्यांनी या दुकानाच्या आजूबाजूलाही काही दुकानांवर डल्ला मारल्याची चर्चा शहरात सुरू होती.

सागर शिवकुमार शेट्टीगिरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री.चव्हाण तपास करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here