नंदुरबारात घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

0
217

नंदुरबार : शहरातील द्वारकाधिश नगरात चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील द्वारकाधिश नगरात रहिमोद्दीन अल्लउद्दीन मन्यार यांचे घर आहे. सदर घराचा कडीकोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड व १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत रहिमोद्दीन मन्यार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५२, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here