नंदुरबार : जिद्दीची ताकद काय असते हे दाखवून देणारा छोट्याश्या खेडेगावातील एक तरुण आज खऱ्या अर्थाने यश मिळत नाही म्हणून हिम्मत हारणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा ठरला आहे.
अपयशाचा जिना चढून आभाळाला गवसणी घालणारा नगाव (ता. नंदुरबार ) या छोट्याश्या गावातील नारायण मगरे…वय वर्ष ३०… गेले १२ वर्ष घरची हलाखीची परिस्थिती असताना उरात पोलीस व्हायचे स्वप्न बाळगून तयारी करीत होता. पण अपयशाने जणू त्याच्यावर प्रेम करावे इतके अपयश त्याच्या वाट्याला येत होते. प्रत्येक भरतीत काहीतरी अडचण यावी आणि नारायणला हुलकावणी मिळावी, हे दरवर्षी ठरले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
वाट्याला अपयश येत होते, अपमान होत होता.. सोबत गरिबी होतीच. पण हा जिद्दीने पेटलेला नारायण काही माघार घ्यायला तयार नव्हता. सोबत शेतीत रमताना आपल्याकडील आहे तेव्हढ्या जमिनीत कुटुंबाचे पोट भरेल एव्हढे उत्पन्न तो आणि त्याचा मोठा भाऊ दोघे शेतीत घाम गाळून घेऊ लागले. शेतीत घाम गाळताना मात्र याची वर्दीची हौस काही मनातून जात नव्हती.

दरवर्षी अभ्यास करायचा पण.. कुठे ग्राउंड तर कुठे पेपरमध्ये अपयशाचा फेरा नारायणचा पिच्छा सोडत नव्हता. इकडे मात्र याची जिद्द काय केल्या कमी होईना. शेवटी एक तप उलटल्यावर काल नारायची मुंबई पोलिसात निवड झाली आणि त्याच्या संघर्षाला खरे फळ मिळाले. नारायची निवड होताच त्याचे कुटुंबीय, भालेर, तिसी, नगाव या तिन्ही गावातील त्याच्या मित्रपरिवाराने जणू दिवाळी साजरी केली. परिसरातील तरुणांनी काल नारायच्या घरी जाऊन त्यावर शुभेच्छांचा वर्षावच केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर चालताना यश, अपयश हे येणारच… पण आभ्यासात सातत्य राहिले तर अपयशावर मात करता येऊ शकते. पोलीस भरतीचे स्वप्न, शेतीत घाम गाळण्याची ताकद आणि कुस्तीची हौस असणाऱ्या नारायण मगरे या तरुणाने सिद्ध करून दाखविले आहे. नारायणाच्या पुढील प्रवासाला एमडी टीव्हीसह कर्तव्यदक्ष पोलीस परिवाराच्या शुभेच्छा !
जीवन पाटील. कार्यकारी संपादक, एम.डी.टी.व्ही. न्युज ,नंदुरबार.


