… मात्र शिक्षकेतर संघटनेच्या संपाचा बारावीच्या परीक्षांच्या कामकाजावर परिणाम..

0
601

नाशिक: २१/०२/२३

नाशकात विविध केंद्रावर शांततेत पहिला पेपर देण्यात विद्यार्थी मग्न होते..

मात्र शिक्षकेतर संघटनांच्या संपाचा बारावीच्या एकूणच कामकाजावर परिणाम दिसून आला..
मंगळवार दिनांक 21 पासून इयत्ता बारावीची परीक्षेला सुरुवात झाली..

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे.

उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राचे प्रवेशद्वार बंद होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी दक्षता घेऊनच केंद्रावर पोहोचावं अशा सूचना राज्य परीक्षा मंडळांना दिल्यात.

विशेष म्हणजे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी म्हणून आधी दिले जाणारे दहा मिनिटं शासनाने स्थगित केले आहेत… राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली..

नाशिक मधील एस एम आर के महिला महाविद्यालयात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पेपर लिहिण्यास सुरुवात केली..

शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं.. मात्र अन्य शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे करावी लागत असल्याने एकूणच त्यांच्यावर कामकाजाचा ताण पडला..

या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली एस एम आर के महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडमची…. ऐकूया डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम काय म्हणाल्यात…( क्लिप लावा डॉक्टर देशपांडे मॅडम बाईट पूर्ण)

एस एम आर के महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम..

नाशिक जिल्ह्यातील 108 परीक्षा केंद्रांवर होत असलेल्या परीक्षेसाठी 74 हजार 932 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यात विद्यार्थी 41,226 असून मुली 33 हजार 706 आहेत.

परीक्षा कालावधीत सहाय्यक परिरक्षक रनर म्हणून बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत असतील.. ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व विरीत करेपर्यंत चित्रीकरण मोबाईल कॅमेरात करण्याच्या सूचना राज्य मंडळांनी केले आहेत.

संपूर्ण केंद्र परिसराचे चित्रीकरण देखील करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

त्यामुळे नाशकात सध्या तरी विविध परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा झाल्याचे चित्र सकारात्मक पहावयास मिळालं..

मात्र शिक्षकेतर संघटनांच्या संपाचा परिणाम प्रत्येक महाविद्यालयात जाणवला.

त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य होऊन बारावीच्या परीक्षा कामकाजात त्यांची मदत शिक्षकांना होईल ही आशा करूया..
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज नाशिक..

photo of tejas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here