संभाजीनगर : १०/३/२०२३
औरंगाबाद आणि उस्मानाबाद चा नामांतरण झालं..
मात्र मुस्लिम संघटनांकडून छत्रपती संभाजी नगरच्या नावाला आता विरोध होतोय
राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला खरा मात्र महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटवण्यास सुरुवात झाली..
आज 10 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहर बंदची हाक मुस्लिम संघटनांनी दिली..
उस्मानाबाद च नाव धाराशिव तर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर केल्यानं या निर्णयाला मुस्लिम संघटनांकडून विरोध होतोय महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटी तर्फे बंदची हाक दिली आहे..
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येते..
काल एम आय एम या पक्षाकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला.
एकूणच नामांतरणामुळे शहर बंदची हाक दिल्याने सर्व व्यवसाय आणि व्यवसायिकांची दुकाने त्यांना बंद ठेवावी लागणार.. आर्थिक व्यवस्था कोलमडणार..
ब्युरो रिपोर्ट एम.डी.टी.व्ही न्यूज छत्रपती संभाजी नगर