Car falling in Lodhiya kund : 12 वर्षीय मुलीसह कार थेट पाण्यात कोसळली, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

0
5907

Car falling in Lodhiya kund – पावसाळ्यात धबधबा नदी धरण  क्षेत्राच्या ठिकाणी पर्यटक नेहमी गर्दी करतात. पिकनिक स्पॉटवर अपघात घडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. आता अपघाताचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना मध्यप्रदेशातील  इंदुर येथील प्रसिद्ध लोधिया कुंड येथे घडल्याची माहिती समोर आली आहे.

लोधिया कुंडमध्ये एक कार अचानक खाली कोसळते. ज्यावेळी ही कार वरुन खाली कोसळली त्यावेळी कारमध्ये 12 वर्षीय मुलगी बसली होती. या मुलीला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी सुद्धा उडी मारली. दोघांनाही कुंडात बुडताना पाहून उपस्थित पर्यटकांनी त्यांच्या बचावासाठी पाण्यात उडी घेतली. या दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात मुलगी आणि वडील दोघांनाही दुखापत झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सिमरोल येथून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर लोधिया कुंड आहे. या ठिकाणी बिजलपूर येथे राहणारे एक कुटुंब आपल्या 12 वर्षांच्या मुलीसोबत पिकनिकसाठी आले होते. या ठिकाणी कुंडाच्या जवळ टेकडीवर आपली कार उभी केली आणि हे कुटुंब गाडीतून खाली उतरले. पण कारमध्ये 12 वर्षांची एक मुलगी होती.

ज्या ठिकाणी कार उभी करण्यात आली होती ती जागा उताराची होती. कार अचानक पुढे जाऊ लागली आणि थेट कुंडात पडली. कार कोसळत असल्याची दृष्य एका मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. 12 वर्षीय मुलगी कारमध्ये होती आणि कार कोसळताना पाहून मुलीला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी सुद्धा कुंडात उडी मारली.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी कार पुढे सरकत होती त्यावेळी कारमध्ये एक मुलगी बसली होती आणि दरवाजा उघडा असल्याने तिने तात्काळ पाण्यात उडी घेतली. पण या मुलीला पोहोता येत नसल्याने तिला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी सुद्धा पाण्यात उडी घेतली. या दोघांनाही इतर पर्यटकांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुदैवाने दोघांनाही कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झालेली नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here