जात प्रमाणपत्र पडताळणी: आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन..

0
128

धुळे:२२/३/२३

सन 2022-23 मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित असणारे विद्यार्थी आणि सन 2023-24 च्या शैक्षणिक सत्रात सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे, तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने समितीला सादर करावे.

असे आवाहन धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त राकेश महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी अॅग्री, बीफार्म, बीएससी नर्सिग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी थेट व्दितीय वर्षाला प्रवेशात्सुक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी कशासाठी?

मागासवर्गीय विद्याथ्यांना शिक्षण नोकरीत आरक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करावी लागते. त्यासाठी हे प्रमाणपत्र द्यावे लागते.
प्रस्ताव सादर करण्याची मुदत संपतेय सन 2022-23 मध्ये आकरावीत व बारावीत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.

एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी अॅग्री, बीफार्म, बीएससी नर्सिंग आदी प्रवेशित विद्यार्थ्यांनी सुध्दा त्वरीत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.
प्रस्ताव लवकर सादर करावे जात प्रमाणपत्र पडताळणीची ऑनलाइन प्रक्रिया सुरळीत झाली असून, अर्जदार जात प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर पडताळणीचा शासकीय (www.bartievalidity.maharashtra.gov.in) जावून ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करु शकतो.

त्यामुळे संबंधीत अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाइन भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे येथे लवकरात लवकर सादर करावा.
कागदपत्र काय लागतात अर्जदार, अर्जदाराचे वडील, आजोबा व पंजोबा यांचे शालेय दाखले किंवा जन्म नोंदी, मानीव दिनांकापुर्वीचे पुरावे, अर्जदार शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड, शिफारस पत्र, व नमुना-3 व नमुना 17 प्रतिज्ञापत्र हे सर्व कागदपत्रांचा एक बंच करून त्यांचा ऑनलाइन पध्दतीने फॉर्म भरावाच हार्ड कॉपी राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे या समिती कार्यालयात सादर करावे.

असे राकेश महाजन, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जीवन पाटील,कार्यकारी संपादक,एम. डी .टी. व्ही. न्यूज,नंदुरबार

WhatsApp Image 2023 03 10 at 09.50.26

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here