नंदुरबार : शहरातील अनेक मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण कालअखेर पालिकेकडून हटविण्यास सुरुवात करण्यात आली. दोनदा नोटीस देऊन व दोनवेळा २४ तसंच अल्टिमेटम देऊन देखील अतिक्रमणधारकांनी याकडे कानाडोळा केल्याने अखेर मुख्याधिकारी यांनी पालिकेचा बुलडोझर या अतिक्रमणांवर फिरला आहे. मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांच्या या दबंग कामगिरीने नंदुरबार शहरातील वर्दळीचे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी केलेल्या कारवाईचे जनसामान्यातून कौतूक करण्यात येत आहे. मात्र, सदर रस्ते हे नेहमी असेच मोकळे राहण्यासाठी पालिकेने खबरदारी घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार शहरातील पंचायत समिती कार्यालय, रेल्वे उड्डाण पूल लगत असलेले, शहर पोलिसस्थानक, खोडाई माता मंदिर, मोठा मारुती परिसर, नाट्य मंदिर परिसर, अमर चित्र मंदिर परिसर आदी ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याचप्रमाणे नवापूर चौफुली, धुळे चौफुली, मोठा मारुती, पंचायत समिती कार्यालय आदी ठिकाणची १०० पेक्षा होर्डिग्स काढण्यात आली.
नंदुरबार पालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुलकीत सिंह यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार,अतिक्रमणधारकांची गैरसोय होवू नये यासाठी आधार केंद्रात केलेली निवाऱ्याची व्यवस्था, फेरीवाल्यांना योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन, बेकायदेशीर असलेले गतिरोधक हटविण्यासाठी चालविलेली मोहिम, शेकडो होर्डिंग्स जप्तीची कारवाई, नंदुरबार पालिकेची रखडलेली कर वसुलीला गती देण्यासाठी जप्ती मोहीम अशा एक-ना-अनेक मोहीम राबविण्यात आल्याने एक कर्तव्यदक्ष दबंग अधिकारी म्हणून पुलकीत सिंह यांच्याकडून शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता काढण्यात येत असलेले अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी पालिकेने विशेष खबरदारी घ्यावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार