जोतिबा यात्रेसाठी आरोग्य सुविधांचे नियोजन करा : सी.ई.ओ संजय चव्हाण..

0
117

कोल्हापूर :२९/३/२३

जोतिबा चैत्र यात्रेसाठी अॅम्ब्युलन्ससह आवश्यक औषधे, ओ आर. एस. पाणी आदी आवश्यक आरोग्य विषयक सोई, सुविधांचे सुयोग्य नियोजन करा.

यासाठी आरोग्य विभागाकडील आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामगिरीचे आदेश काढून आरोग्य पथके तयार ठेवा.

यात्रेदरम्यान पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘एफटीके’ किटचा वापर करावा असे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिले.

सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आरोगय समितीची सभा पार पडली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यासह सर्व कार्यक्रम अधिकारी प्रत्यक्षात व तालुका वैद्यकीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
बैठकीमध्ये राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत ज्या प्रा. आ. केंद्रामध्ये झिरो डिटेक्शन होते, त्या केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश सीईओ चव्हाण यांनी दिले.

यावेळी जिल्हयात एकूण 84 शासकीय यंत्रणेमार्फत 94 क्षयरोग रुग्ण दत्तक घेतल्याबद्दल ज्यांनी पालकत्व स्विकारले आहे, त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा-
शासकीय संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीत वाढ होत आहे.

आर. सी. एच. इंडीकेटरमधील कामांत वाढ करुन जिह्याचे रेकींग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

जागरुक पालक सुदृढ बालक कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व मुला-मुलीची आरोग्य तपासणी पूर्ण करुन संदर्भित मुलांवर आवश्यकतेनुसार उपचार पेंवा सर्जरी करण्याचे नियोजन करावे अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या.

कोविड लसीकरण मोहिमेची तयारी करा –
जिह्यात कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्यामुळे सदर लसीकरणाचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरणाची तयारी करावी. सध्या राज्यात तसेच जिल्हयात पूर व कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

याचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, संतुलित आहार घेणे व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबाबत लोकांना आवाहन करा.

शासकीय आरोग्य संस्थांतील औषधे, साधन सामग्री, ऑक्सीजन सिलेंडर आदी आवश्यक सुविधा सुस्थितीत असलेबाबतची खात्री करावी असे निर्देश चव्हाण यांनी दिले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

‘स्वच्छता दिवस’ उपक्रम राबवा
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या आदेशानुसार 7 एप्रिल 2023 रोजी आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता दिवस पाळण्याचा उपक्रम राबवून सर्व आरोग्य संस्था स्वच्छ व सुंदर राहतील याची दक्षता घेणेबाबत डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सारिका गायकवाड,प्रतिनिधी,कोल्हापूर एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here