नंदुरबार /धुळे : 2/03/2023
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील लोकसभा संपर्कप्रमुख पदावर विविध नियुक्ती करण्यात आल्या..
आगामी लोकसभा निवडणुका समोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून या अधिकृत नियुक्त्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्या..
त्यात नंदुरबार आणि धुळे लोकसभा संपर्कप्रमुख पदी शिंदे गटात सामील झालेले नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर नंदुरबार व धुळे लोकसभेची संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली..
नंदुरबार शहरासह नंदुरबार जिल्ह्यात आणि धुळे जिल्ह्यात गेली कित्येक दशके माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपली अमोघ वाणी, राजकीय नेतृत्व, दांडगा जनसंपर्क, लोकाभिमुख प्रतिमा, सतत कार्यकर्त्यांमधला वावर आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबार नगरपालिकेचं केलेलं शानदार उद्घाटन या सगळ्या गोष्टी ठळकपणे अधोरेखित करतात म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वानं त्यांच्यावर टाकलेला हा ठाम विश्वास लोकसभा जिंकण्यासाठी निश्चितच फलदायी ठरेल असं वाटतं..
हेही वाचा : औरंगाबाद बस स्थानकाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर.. – MDTV NEWS
नंदुरबार आणि धुळे लोकसभा मतदारसंघ आणि त्याची व्याप्ती मोठी असल्याने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना सदर मतदार संघ पिंजून काढावा लागेल..
तसं ते त्यांना कठीण नाही..
परंतु विरोधकांना भुईसपाट करण्यासाठी रघुवंशींच्या निमित्ताने एक दमदार फळी उभी करता येऊ शकते हा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असावा..
म्हणूनच ही धुरा त्यांच्या खांद्यावर टाकून त्यांना पुन्हा एकदा राजकीय उभारी देण्यासाठी उपयुक्त ठरेल..
याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतंच मध्यवर्ती कार्यालय टेंभी नाका, ठाणे येथून जारी करण्यात आलं..
यासह महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांसाठी संपर्क संपर्कप्रमुखांच्या नियुक्ती करण्यात आल्या..
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना एम.डी .टी.व्ही कडून हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन..
नारायण ढोडरे
नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी, एम.डी .टी.व्ही न्यूज