तळोदा /नंदुरबार -२७/७/२३
सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून तळोदा- धडगाव रस्त्याची ओळख आहे.मात्र या रस्त्यात असलेल्या चांदसैली घाटात डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूसंखलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यादृष्टीने हा मार्ग आता महिनाभर बंद राहणार आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा :
दरड प्रतिबंधक उपाययोजना :
नंदूरबार- तळोदा- धडगाव मार्गावर असलेल्या चांदसैली घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड प्रतिबंधक उपाययोजनांचे कामासाठी साधारण महिनाभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक शहाद्याकडून वळविली आहे.
महिनाभर काम :
या मार्गावरील धोकादायक वळणावर गॅबियन संरक्षण भिंत उभारण्यासाठी मार्गावरील वाहतूक २८ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. येथून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आले आहेत. या संदर्भातला आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिला असून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आले आहे ..
धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याला कमी अंतरात जोडणारा चांदसैली घाट हा दुरुस्तीच्या कामासाठी एक महिना बंद करण्यात आला आहे. यातच चांदसैली घाटातील मार्गात बदल करण्यात आला असून या मार्गावरील वाहने शहादातर्फे नंदुरबार तर दुसरीकडून अक्कलकुवा मार्ग नंदुरबार असा मार्ग केला आहे ..
नितीन गरुड ,तळोदा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार