Chetak Festival Sarangkheda : दोन दिवसात ३१ लाखांची उलाढाल ; २७०० हून घोडे दाखल

0
144
Chetak Festival Sarangkheda Turnover of 31 lakhs in two days

Chetak Festival Sarangkheda – चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगितेला सुरुवात; नुकरा प्रजातीच्या घोड्यांची सौंदर्य स्पर्धा संपन्न ; राजस्थान राज्याचा अर्शदिप सिंह यांचा सरदारजी घोडा आला प्रथम…

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगितेला सुरुवात झाली आहे. त्यात नुकारा प्रजितीच्या घोड्यांची सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्षदिप यांचा गंगानगर राजस्थान राज्याचा सरदारसिंग नावाचा घोडा, द्वितीय क्रमांक आसमान (पंजाब) तर तृतीय समंदर कंनोज  उत्तर प्रदेश यांनी क्रमशः विजयी झाले.

या स्पर्धेमध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील नामवंत व देखणे घोडे सहभागी झाले होते. घोड्यांची उंची, रंग, चाल, डोळे, शरीराची बांधा यांचे परीक्षण करून विजेता घोषित करण्यात आला. एकूण ३१ घोड्याचा सहभाग होता. विजेत्या अश्वाला सन्मान चिन्ह देउन गौरवण्यात आले. चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगितेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. टेन्ट पेगिंग, पोल बेंडींग, हॉर्स जम्पिंग, बॉल इन बकेट, ड्रेसाज, अश्व दौड रेवाल व विविध अश्व प्रजातींच्या अश्व सौंदर्य स्पर्धा घेतल्या जाणार आहेत त्यातील नुकरा प्रजातीतील स्पर्धा काल संपन्न झाली. आज काठीयावाड प्रजातीतील अश्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्पर्धेत जास्तीत जास्त आश्र्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन चेतक फेस्टिवल चे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण पिंदर शेरीवाला (भटिंडा, पंजाब) विकास बोयतकर (पुणे महाराष्ट्र), यारविंदर सिंग (मुकसर, पंजाब)

यांनी केले. यावेळी चेतक फेस्टिवल चे अध्यक्ष जयपालसिंह रावल, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, प्रणवराजसिंह रावल, रणवीरसिंह रावल पोलिस उपनरीक्षक निलेश बारे आदी मान्यवर उस्थितीत होते.

Chetak Festival Sarangkheda

सारंगखेडा घोडे बाजारात २७०० हून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दोन दिवसात ३१ लाखाहून अधिक घोडे विक्री झाले आहेत. भारतातील विविध राज्यातील घोडे व्यापारी घोडे खरेदी विक्रीसाठी येत असतात. दोन दिवसात ३१ लाख २७ हजार ९१ रुपये चे घोडे विक्री झाली आहेत. आतापर्यंत सर्वात महाग घोडा १ लाख ५१ हजाराचा विक्री झाला आहे. तो घोडा कोल्हापूर येथील बाळू मामा देवालय आदमापुर यांनी विकत घेतला आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी माहिती दिली

प्रतिनिधी सारंगखेडा
गणेश कुवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here