चेतना पाटील राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित!

0
113
a3d8d4d5 9966 459f ad5d c87e871f4444

नंदुरबार – येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या शिक्षिका चेतना दिनेश
पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल
कोल्हापुर येथील अविष्कार फाउंडेशन इंडियातर्फे राज्यस्तरीय राजमाता
जिजाऊ पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.


शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल नंदुरबार
जिल्ह्यातून चेतना दिनेश पाटील यांची निवड करण्यात आली.या सोहळ्यास
सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे , सोलापूर जिल्हा परिषदेचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, बार्शी येथील संचालक सचिन वायकुळे
,अविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.

चेतना पाटील यांना यापूर्वी कुणबी पाटील युवा मंच तर्फे समाज भूषण ,समाज रत्न
तथा महिला सक्षमीकरणाबद्दल सामाजिक पुरस्कार , सावित्री बाई फुले
पुरस्कार, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत.
ज्ञानरचनावादी अध्यापनातील त्यांचे कार्य पाहून त्यांची निवड महाराष्ट्र
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारती पुणे यांच्या
पाठ्यपुस्तक परीक्षण यासाठी करण्यात आली आहे.

श्रीमती हि.गो.श्रॉफ
हायस्कूल,नंदुरबार येथे गेल्या बारा वषार्पासून कार्यरत असून त्यांनी
मराठी विज्ञान परिषद,नंदुरबार विभागामार्फत विविध उपक्रम राबविले आहेत.
सार्वजनिक शिक्षण समिती, देव मोगरा एज्युकेशन सोसायटी तसेच नंदुरबार
तालुका विधायक समिती या संस्थांमध्ये भूगोल या विषयाच्या कृतीयुक्त
कार्यशाळा घेतल्या आहेत.आशापुरी फाउंडेशन मार्फत त्या आईन्स्टाईन रोबो
क्लब व नक्षत्र छंद मंडळ विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी
चालवत असतात. महिला सक्षमीकरण ‘बेटी बचाव बेटी पढाव’ यासारखे उपक्रम
चेतना पाटील राबतात.

खगोल अभ्यासक म्हणून अनेक
खगोलीय घटांनाचा आनंद नंदुरबार करांना देण्याचा त्यांचा प्रयत्न
असतो.वास्तू शास्त्राच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून वास्तू अभ्यासक
आहेत वास्तूत्ांज्ञ म्हणून विनामूल्य मार्गदर्शन करतात. या सर्व
गोष्टींचा विचार करता अविष्कार फाउंडेशने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ
पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here