जिल्हा बँकेची निवडणूक लावणे हे अतिशय अविचारी – छगन भुजबळ..

0
259

*नाशिक जिल्हा बँक आर्थिक सुस्थितीत येईपर्यंत प्रशासक व्यवस्था कायम ठेवावी : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व सहकार मंत्र्याकडे मागणी

*जुलै नंतर नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार…..

नाशिक/मुंबई -२८/५/२३

बँकिंग नियमन अधियन १९४१ चे कलम ११ मधून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बाहेर येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरु न करता या बँकेवर प्रशासक कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

a1ad586c 6e91 4a11 bf4c c92638d32466
1
a0c2a0cd 77a8 4979 89c4 7e51f713aac4
2
dcaf678e 67a0 4291 b23e 2d05b37450dd
3

जुलै २०२३ नंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती पूर्व पदावर येईपर्यंत निवडणुका घेऊ नये असे म्हटले आहे.

याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे आदेश दि. २३ मे २०२३ अन्वये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया दि. ३० जून २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याचा अर्थ ३० जून २०२३ नंतर या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. बँकेची आ

आर्थिक स्थिती पाहता निवडणूक लावणे हे अतिशय अहिताचे ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, सन २०१७ ते मार्च २०२१ पर्यंत सदर बँक रिझर्व्ह बँकेद्वारा विहित केलेली ९% भांडवल पर्याप्ता (CRAR) राखू शकलेली नाही. त्यामुळे बँकिंग नियमन अधिनियम १९४९ चे कलम ११ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने या बँकेवर प्रशासक बसवलेला आहे.

मात्र बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नसतांना बँकेची निवडणूक लावली तर या सहकारी बँकेची अक्षरशः वाट लागणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे, अनुप्तादित कर्जाची वसुली करणे, बँकेची भांडवल पर्याप्तता वृद्धिंगत करणे आणि थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासक मंडळाकडून अतिशय चांगल्या उपाययोजना केल्या जात आहे.

हळूहळू बँक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासकांकडून सकारात्मक कार्यवाही केली जात असल्याने प्रशासकांना पुरेशा कालावधी मिळणे आवश्यक आहे. अजून काही दिवस प्रशासकांना ठेवले तरच ही बँक आर्थिक सुस्थितीत येणार आहे.

मात्र या वस्तुस्थितीचा आणि बँकेसोबतच बँकेचे सभासद आणि शेतकऱ्यांचा विचार न करता बँकेची निवडणूक लावणे हे अतिशय अविचारी ठरणार आहे. त्यामुळे बँकिंग नियमन अधियन १९४१ चे कलम ११ मधून ही बँक बाहेर येईपर्यंत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु करू नये, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

या पत्राची सहकार विभागानं दखल घेत याबाबत सविस्तर आदेश पारित केले .. यानंतर छगन भुजबळांनी समाधान व्यक्त केलं ..

202305231807053302 1 page 0001
1
202305231807053302 1 page 0002
2

तेजस पुराणिक नाशिक जिल्हा प्रतिनिधीसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here