नाशिक /मुंबई : १९/३/२३
आशा सेविकांना नियमित वेतन व कायम करण्याबाबत राज्य शासनाने धोरण आखावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.
त्यावरील उत्तरात शासन तज्ञ समितीची नेमणूक करून याबाबत अहवाल तयार करून केंद्र शासनास पाठविणार असल्याची माहिती मंत्री आरोग्य तानाजी सावंत यांनी दिली.
राज्यातील आरोग्य विभागातील आशा सेविका गटप्रवर्तक व बीसीएम यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, आशा सेविकांना किमान वेतन आणि नियमित करण्याबाबत कुठलेही धोरण नाही.
नोकरीत सगळीकडे धोरणाचा अवलंब करण्यात येतो त्याप्रमाणेच आशा सेविकांसाठी सुद्धा धोरण आखण्यात यावे.
आशा सेविकांचा निर्णय केंद्राचा जरी असला तरी केंद्र शासनावर अवलंबून न राहता माणुसकी आणि त्या करत असलेल्या सेवेच्या दृष्टीने विचार करून त्यांच्यासाठी निश्चित धोरण निर्माण करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
त्यावरील उत्तरात आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आशा वर्कर यांच्या वेतन व कायम सेवेच्या धोरणाबाबत शासन सकारात्मक आहे.
हा विषय केंद्राचा असल्याने राज्यशासनाच्या वतीने तज्ञ समितीची नेमणूक करून अहवाल तयार करण्यात येईल.
त्यानंतर हा अहवाल मान्यतेसाठी केंद्र शासनास पाठविण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी, नाशिकसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,मुंबई