मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची हजेरी..
प्रसिध्द श्री शिव महापुराण कथाकार प.पू.पंडित प्रदिपजी मिश्रा (सिहोर) यांची रंगणार श्री शिव चर्चा ..
नंदुरबार -२०/४/२३
छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उदघाटनासाठी 22 एप्रिल 2023 रोजी नंदुरबार शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे ..
नंदुरबार जिल्ह्याला वरदान ठरेल असे १२५ बेडचं सुसज्ज असं छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण येत्या २२ एप्रिलला होत आहे ..
लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात,शहराच्या ठिकाणी न जाता आपल्याच भागात आवश्यक सुविधा मिळाव्यात म्हणून हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेत लोकार्पणाच्या माध्यमातून सुरु होतोय ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्याच्या निमित्तानं राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि प्रसिध्द श्री शिव महापुराण कथाकार प.पू.पंडित प्रदिपजी मिश्रा (सिहोर) यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे ..
तरी या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी काय असणार या विषयी माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी माहिती दिलीय ..
ऐकू या नेमकं श्री. रघुवंशी काय बोललेत ..
प्रसिध्द श्री शिव महापुराण कथाकार प.पू.पंडित प्रदिपजी मिश्रा (सिहोर) हे उपस्थित भाविकांना श्री शिव चर्चा माध्यमातून निरूपण करणार आहेत .. तरी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी आणि शिवप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे ..
हा सोहळा छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रांगण,बायपास रोड ,नंदुरबार येथे संपन्न होईल .. दुपारी एक वाजता २२ एप्रिल रोजी हा सोहळा पार पडेल ..
जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार