‘देख रहा बिनोद…’ MIM, भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाचे नेते एकाच व्यासपीठावर..

0
271

छत्रपती संभाजीनगर-७/४/२०२३

राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही.

कोणता आमदार कुणाच्या गटात सामील होईल, याचा पत्ता नाही.

अलीकडे छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून MIM आणि इतर सत्ताधारी पक्षामध्ये वाद पेटला होता. पण आता भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि MIM चे नेते एकाच व्यासपीठावर पाहण्यास मिळाले.

नेहमी एकमेकांना रोज पाण्यात पाहणारे, ऊठसूट एकमेकांवर टीका करणारे, प्रसंगी खालच्या शब्दात एकमेकांचा पाणउतारा करणारे नेते जर एकत्र एकाच मंचावर आले तर? असं होऊ शकतं का? असं तुम्हाला वाटत असेल.

पण राजकारणात काहीही होऊ शकतो.

थोड्यावेळापूर्वी एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे नेते काही वेळात गळाभेट करतानाही दिसतात.

यालाच राजकारण म्हणतात.

संभाजीनगरातही राजकारणातील हाच प्रत्यय प्रत्येकाला अनुभवाला आला.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी MIM चे खासदार इम्तियाज जलील, भाजपचे नेते गिरीश महाजन, अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांच्यासह इतर नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

नुसते एकत्र आले नाही तर हे नेते एकमेकांची टोपी उडवताना दिसत होते.

हास्य विनोदात रमलेले दिसत होते.

विशेष म्हणजे, मागील आठवड्यात संभाजीनगरामध्ये काही समाजकंटकांनी उच्छाद मांडला होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आज तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्याचे पाहून संभाजीनगरवासियांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

एम. डी. टी. व्ही. न्युज ब्यूरो,छत्रपती संभाजीनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here