मुंबई -५/६/२३
सिनेसृष्टीची ‘आई’ अशी ओळख असलेल्या दिवंगत अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
आज यांच्या दादर प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी दीदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.


सुलोचना दीदींचे निधन ही महाराष्ट्राला आणि चित्रपटसृष्टीला चटका लावणारी घटना आहे.
सुलोचना दीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी आपल्या आईपासून पोरकी झाली आहे असे मनोगत यावेळी व्यक्त केले.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई