मुंबई -१७/५/२३
जलयुक्तशिवार साठी ५४५ कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचनसाठी ४२५ कोटी निधीची तरतूद केली आहे.
त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी या योजना प्रभावीपणे राबवा. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.
तसेच या योजनांमधील कामांना गती द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अधिकाऱ्यांना नुकतेच निर्देश दिलेत ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जलयुक्तशिवार २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांसंदर्भात सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी ठाणे येथून ई-संवाद साधला.
मंत्रालयातून मंत्री शंभूराज देसाई सहभागी झाले होते.
एम डी टी व्ही न्यूज मुंबई ब्युरो