मराठी भाषिकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा – छगन भुजबळ

0
198

नाशिक/मुंबई : २८/०२/२०२३

कर्नाटक सीमाभागातील बेळगाव कारवार परिसरातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार कडून अन्याय होत आहे. मराठी भाषिकांवरील अन्याय तातडीने दूर करण्यात यावा.

सुप्रीम कोर्टात या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत माणुसकीच्या भावनेतून कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा तसेच प्रसंगी केंद्रीय गृहमंत्र्यांना याबाबत अवगत करावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.

बेळगाव कारवार मधील हजारो लोकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आज मुंबईत धरणे आंदोलन धरले आहे. या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी सभागृहात औचित्याच्या मुद्यातून सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांवर प्रचंड अन्याय होतोय.

आपल्या मातृभाषेऐवजी कन्नडमधून दैनंदिन व्यवहार करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे.

या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे नोंदवले जात आहेत, लाठीमार केला जातोय.

गेल्या ६९ वर्षांपासून हे सर्व सुरू आहे.

न्यायालयातही हा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे म्हटले आहे.

यामुळे त्रस्त असलेले बेळगाव, कारवारचे नागरिक महाराष्ट्रातील नेत्यांकडे, सरकारकडे आशेने बघत आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी प्रयत्न करावेतच,

पण त्याचबरोबर हा प्रश्न सुटेपर्यंत कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी बांधवांवरील हा अन्याय थांबविण्यासाठीही प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाची जाण आहे.

माझ्यासोबत ते या आंदोलनात होते, त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.

तेजस पुराणिक नाशिक जिल्हा प्रतिनिधीसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here