10 दिवस बालकलावंतांना मिळणार नाटकाचे धडे
नंदुरबार :- येथील गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे (ता.जि.नंदुरबार ) व बाल रंगभूमी परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे नंदुरबार शहरातील एस.ए.मिशन माध्यमिक विद्यालयाच्या जिमखाना येथे आयोजन करण्यात आले आहे. या बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बालनाट्य लेखक, दिग्दर्शक, अभिनेता तथा प्रशिक्षक हनुमान सुरवसे यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून येथे एस.ए.मिशन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक विजय पवार, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे इलेक्ट प्रेसिडेंट फखरुद्दीन जलगूनवाला, इलेक्ट सेक्रेटरी आकाश बेदमूथा, नाट्यकर्मी जय सोनार, चिदानंद तांबोळी आदी उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी बोलताना विजय पवार म्हणाले की, या बालनाट्य प्रशिक्षणातून बाल कलावंतांचे व्यक्तिमत्व विकास घडायला हातभार लागेल. यातून नंदुरबार येथील बालकलावंत नक्कीच मोठे कलावंत होतील यात शंका नाही. अशा प्रकारच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातूनच नंदुरबार जिल्ह्यातील नाट्यचळवळ जोमाने घडू शकेल. या वेळी हनुमान सुरवसे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ नाट्य दिग्दर्शक अजित भगत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिभाऊ करंडकच्या लक्षवेधी एकांकिका प्राप्त ओसामा या एकांकिकेतील बाल कलावंतांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासन आयोजित डॉक्युमेंटरी स्पर्धेत जितेंद्र खवळे दिग्दर्शित ‘हा मै शर्मिन हूं’ यास द्वितीय पारितोषिक मिळाले म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात आला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार किरण दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिबीर प्रमुख राजेश जाधव, नाट्यकर्मी मनोज सोनार, आशिष खैरनार, जितेंद्र खवळे, चिदानंद तांबोळी, राहुल खेडेकर, पार्थ जाधव आदी परिश्रम घेत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.