तळोदा /नंदुरबार :२२/३/२३
आपण विज्ञानाची कास धरली,वैज्ञानिक प्रगती झाली ..
परंतु आपण आपले पशु आणि पक्षी वाचवण्यात कुठेतरी कमी पडलो का याचाही विचार करणं आता गरजेचं झालं.. कारणही तसंच आहे पुढील पिढ्यांना पक्षांचा चिवचिवाट ऐकू येणार का..
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने हा विशेष..
लहानपणी आई आजी आजोबा चिऊताईच्या चिऊ काऊच्या गोष्टी सांगायचे..
आता या गोष्टी केवळ पुस्तकात आणि पुस्तके पानांमध्येच उरणार असं वाटू लागलंय…
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने या गोष्टीचा उहापोह करण्याची वेळ आली होती..
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात जागतिक चिमणी दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला., पक्ष आणि माणूस यांच्यात समतोल राहिला तर निसर्ग टिकतो आणि निसर्गाचा समतोल ही राहतो..
चिमणी या पक्षाची संख्याही कमी होऊ लागल्याने ही चिंतेची बाब आहे..
कारण जंगलतोड होऊ लागली वृक्षतोड होऊ लागली मग या पक्षांना स्वतःचं घरटं मिळणार तरी कुठे..
त्यासाठी चिमण्यांचं संवर्धन करणे गरजेचे आहे चिमण्यांना दाणापाणी मिळेल असं फिडर लावणं प्रदूषण कमी करणे आदी उपाय वगैरे करणे गरजेचे आहे..
हे मान्यवरांचे सूर होते तळोद्यातील कार्यक्रमातून..
प्रांत आणि प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं होतं… मान्यवरांच्या हस्ते बर्ड फिडरचे सर्वांना वाटप करण्यात आलं
आणि विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन फिडर लावण्यात आलं…
सहयोग ग्रुपचे अल्पेश जैन यांनी देखील मार्गदर्शन केलं…
उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सहयोग ग्रुपच्या कार्याचं कौतुक केलं…
चिऊताईंचा चिव चिवट पुन्हा कानी पडण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं..
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील होते..
प्रांत अधिकारी म्हणून मंदार पत्की यांच्यासह सहयोग ग्रुपचे अल्पेश जैन पोलीस निरीक्षक अमित बागुल, स्वप्निल भामरे डॉक्टर संदीप जैन ,डॉक्टर योगेश बडगुजर, डॉक्टर महेश मोरे ,डॉक्टर लोखंडे ,भूषण पाटील, प्राध्यापक रमेश मगरे अशोक सूर्यवंशी ,पंडित भामरे ,प्राध्यापक राजाराम राणे ,रमेश भाट उपस्थित होते…
सहयोग ग्रुपचे सदस्य यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभलं होतं…
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही न्यूज ,तळोदा