अक्कलकुवा येथे युवाशक्ती करिअर शिबीर : जि.प. अध्यक्षांनी केले मार्गदर्शन
नंदुरबार :- १० वी व १२ वी नंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक मार्ग आहेत. योग्य करिअरची निवड केल्याने भविष्यात नोकरीसाठी मोठी संधी निर्माण होईल असेच निवडावं. येणारा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहे. यासाठी आधुनिक करिअर निवडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले. अक्कलकुवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य, रोजगार, उद्योजक व नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्यावतीने युवाशक्ती करिअर शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ.सुप्रिया गावित यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
युवाशक्ती करिअर शिबिरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, सरपंच उषाबाई बोरा, पंचायत समिती सभापती नानसिंग वळवी, अक्कलकुरा औ.प्र. संस्था प्राचार्य आर.पी.नाईकनवरे, अक्राणी औ.प्र. संस्था प्राचार्य एम बी ढोलार यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शिबिरात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या की, योग्य करिअरची निवड केल्याने भविष्यात नोकरीसाठी मोठी संधी निर्माण होईल . यासाठी आधुनिक करिअर निवडणे गरजेचे आहे. येणारा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहे. त्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून अनेक चांगले कोर्सेस आहेत. त्यात कम्प्युटर, मेकॅनिकल इंजिनिअर, ॲनिमेशन अशा महत्त्वाची कोर्सेस निवडल्याने याचा फायदा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना होणार आहे. भारत देश हा विकसित देशात समाविष्ट झाला आहे, त्यामुळे आताचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, असे त्या शेवटी म्हणाल्या.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.