CJI Gavai यांनी सुचवले Justice Suryakant यांच्या नियुक्तीची शक्यता ; केंद्राच्या मंजुरीकडे लक्ष..

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखपदी लवकरच नवा चेहरा दिसणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश CJI Gavai यांनी आपल्या उत्तराधिकारीपदी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव केंद्राकडे शिफारस केले आहे. ही शिफारस मान्य झाल्यास, न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून इतिहास रचतील.
सरन्यायाधीश गवई हे २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सध्या न्यायमूर्ती सूर्यकांत हे CJI गवईंनंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.
पीटीआयच्या सूत्रांनुसार, गवईंनी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नियुक्तीची औपचारिक शिफारस केली आहे. २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून रुजू झालेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ अंदाजे एक वर्ष आणि दोन महिन्यांचा असण्याची शक्यता आहे, कारण सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे.
केंद्राकडून अधिसूचना जारी होताच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. ताज्या घडामोडींसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या!


