शिरपूर :२१/२/२३
शिरपुर तालुक्यात बारावीसाठी ७ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहे .शहरात ३ तर ग्रामीण भागात ४ केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे.
शिरपुर तालुक्यात १२ वी च्या विज्ञान,कला आणि वाणिज्य शाखेतील एकूण ३ हजार ८९२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत.
शिरपुर तालुक्यात शहरातील एस.पी.डि.एम महाविद्यालय आणि उपकेंद्र सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात अ’ केंद्र ,ब’ केंद्र ,आर सी पटेल मेन बिल्डिंग, आणि क केंद्र आर सी पटेल इंग्लिश मिडीयम स्कुल या केंद्रावर
तर ग्रामीण भागातील तऱ्हाडी,अर्थे,थाळनेर,या केंद्राचा समावेश आहे.
शहरात अ’ केंद्र असलेल्या शहरातील एस.पी.डी. एम. महाविद्यालयात ७५० तर उपकेंद्र असलेल्या सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयात ४९२ विद्यार्थ्यांचे नियोजन करण्यात आले आहे .
शहरातील ब’ केंद्र असलेल्या आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय मेन बिल्डिंग येथील केंद्रात ९५९ विद्यार्थ्यांचे तर क’ केंद्र असलेल्या आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ५१८ विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले आहे,
तर ग्रामिण भागातील त-हाडी केंद्रावर १८८, थाळनेर केंद्र १८८, अर्थे ४१७ तर थाळनेर येथील जयश्री पटेल स्कूलमध्ये ३८१ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
तालुक्यात
कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रावर कडक नजर असून परीक्षा केंद्रावर बैठे पथक, भरारी पथक नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच परीक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
राज जाधव.
शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी.एम डी टी व्ही न्यूज