तळोदा :१/०३/२०२३
वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पेहेरावही बदलले असून सध्या बाजारपेठेत गावठी फ्रिज मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. तळोद्यात देखील हे रंगीबेरंगी फ्रिज पाहावयास मिळाले ..
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्याने बाजारपेढेत थंड पेयांना जोरदार मागणी वाढली आहे.
गेले आठवडाभर वातावरणातील उष्मा प्रचंड वाढला आहे.
यामुळे कृत्रिम शितपेयांसह उसाचा रस, ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत यांची दुकाने ठिकठिकाणी दिसू लागली आहेत.
फळांच्या दुकानात कलिंगडांची आवक वाढली असून त्यांची मागणीही आहे.
अनेक ठिकाणी काकडीची विक्रीही तेजीत असल्याचे दिसत आहे.
वाढत्या उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी ग्राहक शीतपेयांच्या दुकानासमोर गर्दी करताना दिसत आहेत.
ऊन्हाच्या कडाक्याचा दैंनदिन जीवनावर परिणाम –
कृत्रिम शीतपेये पिण्याऐवजी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या उसाचा रस व लिंबू सरबत अशा नैसर्गिक पेयांना जास्त पसंती आहे.
याचप्रमाणे तालुक्यातील माखजन, संगमेश्वर, देवरूख, साखरपा बाजारात सर्वसामान्यांना परवडणारे गावठी फ्रिज बाजारात दाखल झाले आहेत.
माठाचे दरही काहीसे उतरल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात ते खरेदी करताना दिसत आहेत.
महेंद्र सूर्यवंशी तळोदा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज