आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ गावित यांचे मार्गदर्शन
नंदुरबार – येथील बाजार समिती निवडणूकसंदर्भात पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली निलेश लॉन्स येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीला खा. डॉ.हिना गावित, भाजपाचे जेष्ठ नेते भिका पाटील, महेंद्र पाटील, रवींद्र गिरासे, शेखर पाटील, मुन्ना पाटील, शरद तांबोळी, जि. प. सदस्य शांताराम पाटील, सागर तांबोळी, लहू पाटील, प्रकाश गावित, वसंत पाटील, दगा कोळी यांच्यासह विविध गावातील सरपंच व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना.डॉ. गावित यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना हक्काचे बाजार समितीमध्ये स्थान मिळावे, इच्छुक उमेदवारांनी आपले कागदपत्र तयार करून ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी केल्या.
जिल्ह्यातील बाजार समिती आपल्या ताब्यात आल्या तर आपल्याला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीच्या हात मिळेल. हमी भाव व शेतकरी यांचा विकासासाठी मदत होईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.
या बैठकीला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी गाव पातळीवर बैठका घेऊन पुढील रणनीत ठरविण्यात येणार आहे. सूत्रसंचालन रवींद्र गिरासे यांनी केले. व संसदरत्न खासदार डॉ. हिना गावित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.