शहादा तालुक्यातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी

0
1284

कृऊबा सभापतींसह पदाधिकाऱ्यांनी घेतली तहसीलदारांची भेट ; भरपाईसाठी निवेदन सादर

शहादा :- तालुक्यात काळ रविवारी झालेल्या चक्रीवादळात शेती पिकांसह मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. केळी व पपईच्या बागा वादळाने जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरांची छपरे उडून गेल्याने निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या नुकसानीची त्वरित पाहणी करून पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शहादा तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, उपसभापती सुरेश नाईक, अरविंद कुवर यांनी तहसीलदार याच्याहस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, रविवार दि. ४ रोजी संपुर्ण शहादा तालुक्यात चक्रीवादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यात काही ठिकाणी पाऊस देखील झाला आहे.

तालुक्यातील शेतकरी येत्या खरीपाच्या हंगामाच्या तयारीत असताना अचानक उदभवलेल्या परिस्थितीमुळे शेतकरी व नागरीकांची तारांबळ उडुन मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात केळी पिकाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जात असते. केळी हे पिक कापणी योग्य आले होते. या वादळी वाऱ्यामुळे सर्वात जास्त नुकसान केळी उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. येत्या हंगामासाठी परीसरातील बहुतांश पपई उत्पादक शेतकऱ्यानी माहे एप्रील मध्ये पपईची लागवड केली होती. सदर लागवड केलेल्या पपईचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊन पपईची झाडे कोलमडली आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शहादा तालुक्यात या रब्बी हंगामातील बाजरी या शेतीमालाची कापणी मळणी सुरू होती. अकस्मात आलेल्या वादळी वान्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळामुळे तालुक्यात काल सकाळपासुन विज पुरवठा खंडित झाला असून विजेचे खांब व तारा जमीनीवर पडल्या आहेत. शेतीसाठी लागणारा विज पुरवठा बंद आहे. रविवारी झालेल्या जोरदार वादळामुळे परीसरातील बऱ्याच घराचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तालुक्यातील शेतकरी व नागरीकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहेत. नुकसानग्रस्त भागातील शेतकरी, नागरीकांचे पंचनामे त्वरीत सुरू करण्यात येवून शासन दरबारी शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्त नागरीकांना मदत देण्यात यावी, काढणीयोग्य झालेल्या केळी या फळपिकाचे बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. तरी संबंधीत विभागास याबाबत सुचना देवून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवानां विमा रक्कम मिळवून देणेबाबत सूचना वजा आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारीसह शेतकरी उपस्थित होते.

संजय मोहिते. एम.डी.टी.व्ही. न्युज शहादा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here