बिग ब्रेकींग : राहूल गांधी यांची खासदारकी रद्द !

0
165
Congress MP Rahul Gandhi disqualified from Lok Sabha

मुंबई – सूरत न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी आज रद्द करण्यात आली आहे.या निर्णयाने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

बदनामी आणि मानहाणीच्या प्रकरणातून काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा विद्यमान खासदार राहूल गांधी यांना काल सूरत न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा सुनावली होती. मात्र याप्रकरणात त्यांना तात्काळ जामीन देखील मंजूर करण्यात आला होता.

तर, यासोबत त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मंगळवार पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आज यावर शिक्कामोर्तब झाले असून सध्याच्या नियमानुसार दोन वा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकप्रतिनिधी अपात्र होत असतो.

याच नियमानुसार लोकसभेच्या सभापतींनी आज राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची घोषणा केली केली. यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

एम डी टी व्ही न्युज ब्यूरो… मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here