Corona Cases Update – कोरोना व्हायरसचा धोका पुन्हा वाढला आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासात भारतात ६४० रुग्णांचा नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०००च्या जवळपास आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात ६४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ३७९ पुरुष आणि २६१ महिला रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (१३१), दिल्लीत (८६), केरळमध्ये (७२) आणि उत्तर प्रदेशात (५४) नोंदवले गेले आहेत.
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६६९ वरून २९९७ वर पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १०६१, दिल्लीत ३३२, केरळात २१७ आणि उत्तर प्रदेशात १७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
देशातील आतापर्यंतची कोविड-१९ रुग्णांची संख्या आता ४.५० कोटींच्या पुढे गेली आहे. केरळमध्ये आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे.
मुंबईत देखील कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्भूमीवर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व ३४ बाधितांची ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून 16 महापालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स रुग्णालयासह सुमारे साडेपाच हजार बेड तैनात ठेवण्यात येणार आहेत.