नंदुरबार :- जिल्हा क्राईम ब्रांच या पोलीस विभागात कार्यरत असलेले पंकज महाले यांना १ मे या महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन पोलीस विभागाकडून गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल महाले यांचा नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेकडून सत्कार करण्यात आला.
देव मोगरा माता मंदिराच्या परिसरात नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेची त्रैमासिक मीटिंग घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे होते. राष्ट्रसंत संत सेना महाराज प्रतिमा पूजन करून सभेची सुरुवात झाली. सभेमध्ये विविध विषयांवर चारचा करण्यात आली. राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड या आपल्या हक्काच्या व्यासपीठाचा वापर सर्व समाज बांधवांनी करावयाचा आहे व आपला आर्थिक विकास करावा, असे आवाहन मीनाक्षी भदाणे यांनी केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या कार्यक्रमात जिल्हा क्राईम ब्रांच या पोलीस विभागात कार्यरत असलेले समाजातील पंकज महाले यांना १ मे या महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन पोलीस विभागाकडून गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल महाले यांचा नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेकडून सत्कार करण्यात आला.
आभार संस्थेचे जिल्हा संघटक विजय सैदाणे यांनी मानले. सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे, उपाध्यक्ष अरविंद निकम, सचिव हिमांशु बोरसे, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश देवरे, सहसचिव छगन भदाणे, कोषाध्यक्ष शिवाजी मिस्त्री, संघटक विजय सैदाणे, संचालक शशिकला सोनवणे, छगन सूर्यवंशी, प्रकाश सैदाणे, नरेंद्र महाले, मयूर सूर्यवंशी, सुधीर निकम, रवींद्र सोनवणे, अनिल भदाने, ज्ञानेश्वर सोनवणे, सल्लागार ओंकार शिरसाट, शेलंबा तालुका अध्यक्ष राजेश सूर्यवंशी, अनिता सूर्यवंशी, युवा मोर्चाचे अध्यक्ष समाधान सैंदाणे, जयेश सोनवणे, तळोदा तालुका अध्यक्ष विजय सैंदाने ,विष्णू सैंदाणे, दिलीप सूर्यवंशी, हेमंत बिरारे, निळकंठ महाले, पंकज महाले आदी समाज बांधव उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.


