गुंगीकारक औषध देऊन लुटणारी महिला व तिच्या चार साथीदारांची टोळी जेरबंद..

0
461

चार गुन्हे उघडकीस :गुन्हे शाखा युनिट क्र-1 ची कारवाई

नाशिक -२८/५/२३

म्हसरूळ पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे फिर्यादी बापू किसन सूर्यवंशी सिडको येथील राहणार सावता नगर यांनी तक्रार दिली साडेआठ वाजेच्या सुमारास एका अनोळखी महिलेने मला फोन करून सुरत येथे जायचे आहे असे सांगून हॉटेल सायबाच्या पुढे अमृततुल्य दुकानासमोर कार मध्ये बसवले..

FxBVKZeaUAAsJuK
1

सदर महिलेसह तिच्या मित्राने कार मध्ये बसवून देवीचा प्रसाद सांगून गुंगीचे औषध टाकलेल्या पेढा खायला दिला..

फिर्यादी बेशुद्ध झाल्यानंतर त्याची कारवा अंगावरील सोन्याचे दागिने व पाकीट असे एक लाख 91 हजार रुपये किमतीचा माल चोरून चोरटे फरार झाले
म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 102/2023 कलम 328 379 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे म्हसरूळ पोलीस स्टेशनला गुन्ह्यात सहभागी असणारा आरोपी निलेश राजगिरे यास प्रथम निष्पन्न केला
सदर इसमाने या संदर्भात सविस्तर माहिती देत या गुन्ह्यातील सहभागी असणारी मुख्य महिला व मुख्य आरोपी दिनेश कबाडे व त्यांचे साथीदार किरण वाघचौरे मनोज पाटील यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झालं

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दिनेश कबाडे या सापळा रचून 22 मे रोजी जेल रोड भागातून ताब्यात घेण्यात आलं
त्यांच्या कारमधून गुंगीकारक औषधे प्राप्त झाली..
महिला आरोपीचा शोध घेऊन तिला 23 मे 2023 रोजी ताब्यात घेण्यात आलं.. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 26 मे 2023 रोजी पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली.. एकत्रित अधिक तपास करता त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची सदर कबुली दिली
सदर आरोपींकडून मसरूळ पोलीस स्टेशन कलम 328 379 34 याप्रमाणे, आडगाव पोलीस स्टेशन कलम 328 379 आणि 34 याप्रमाणे, कासा पोलीस ठाणे पालघर कलम 328 392 आणि 34 याप्रमाणे विविध गुन्हे उघडकीस आलेले आहेत..
यातील मुख्य आरोपी दिनेश कबाडे यांच्यावर अहमदाबाद येथील कनबा पोलीस ठाणे येथे 302 120 ब 114 34 याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत ते उघडकीस येण्याची शक्यता आहे,.
तर किरण वाघचौरे यांच्यावर सिटी पोलीस ठाणे श्रीरामपूर येथे 379,34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत..
सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहे..
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे नाशिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, महेश साळुंखे ,आप्पासाहेब पानवळ, मुक्तार शेख सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड ,मनोज डोंगरे, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांचा या पथकात समावेश होता..

पथकातील या सर्वांनी ही दमदार कामगिरी बजावली आहे..
महिलेसह या तिच्या साथीदारांच्या मुसक्या आवळत त्यांना जेरबंद केलं.

तेजस पुराणिक,नाशिक जिल्हा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here