जळगांव -२५/५/२३
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्याचा बालक उपचारादरम्यान दगावल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
परिचारिका कक्षाची तोडफोड करून औषधांचे रॅक फेकून नुकसान केल्याची घटना आज घडली आहे. तसेच रुग्णालयीन कागदपत्रांची कार्यवाही न करता मयत बालकाला घेऊन पसार झाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनातर्फे तक्रार देण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील रहिवासी असलेले विजय कोळी यांनी त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला सोनल हिस सोमवार 22 मे रोजी संध्याकाळी प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे दाखल केले होते. दरम्यान रुग्णाची प्रकृती खूप गंभीर होती. रुग्णाला न्युमोनिया आणि झटके येत होते.
याबाबतची कल्पना बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. रुग्णाला 14 नंबर आयसीयू विभागात भरती देखील केले. रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
याबाबत डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कळविले. मात्र, बालकाचा मृत्यू झाल्याबद्दल समजूतदारपणाची भूमिका न घेता नातेवाईकांनीच डॉक्टरांवर व परिचारिकांवर संताप व्यक्त केला. शिविगाळ करून त्यांनी औषधे ठेवलेला रॅक जोरात फेकून दिला.
त्यामुळे औषधींचे नुकसान झाले. तसेच बाहेर जात असताना परिचारिका कक्षाजवळ जात त्यांनी कक्षाची काच फोडली. त्यामुळे कक्षामध्ये काचांचा खच पडला. परिचारिका व डॉक्टर समजावीत असताना त्यांना शिवीगाळ केली.
त्याच वेळेला रुग्णाच्या महिला नातेवाईकांनी मयत बाळाला घेऊन बाहेर पोबारा केला. याबाबत वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,जळगाव