आमदार राजेश पाडवी यांनी मराठे परिवाराला केला ४ लाखाचा धनादेश सुपूर्द
तळोदा :- रविवारी अचानक आलेल्या चक्रीवादळात तालुक्यातील चिनोदा गावाजवळ कारवर वडाचे झाड कोसळून त्यात मृत्यू झालेल्या राजेंद्र मराठे यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून तत्काळ चार लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे. हा धनादेश आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते स्व.राजेंद्र रोहिदास मराठे यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.
गुजरात राज्यात कमी दाबेचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा फटका नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. ताशी ५० ते ६५ किमी वेगाने आलेल्या वादळात वित्त हानीसह पशुधन व पिकांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तळोदा तालुक्यातील चिनोदा गावानजीक रस्त्यावर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळून प्रतापपूर येथील राजेंद्र रोहिदास मराठे (वय ४८) यांचा झाडाखाली दबून मृत्यू झाला होता. राजेंद्र मराठे हे घरात एकटे कमावते असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे मराठे परिवाराचा संसार उघड्यावर आला होता. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत त्यांचा मृतदेह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आनण्यात आला होता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी आमदार राजेश पाडवी, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, सहायक मदत जिल्हाधिकारी मंदार पत्की, तहसीलदार गिरीश वखारे यांनी नातेवाइकांना व ग्रामस्थांना आश्वासित केले होते. तहसीलदार गिरीश वखारे यांनी तत्काळ कारवाई करीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून मराठे कुटुंबीयांना चार लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. सोमवारी सायंकाळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मराठे परिवाराला धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, प्रभाकर उगले उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो तळोदा