दबंग अधिकारी घेणार पुन्हा नंदुरबारचा चार्ज !

0
2718

पुलकित सिंग १२ जून पासून नंदुरबारच्या तहसीलदारपदी होणार रुजू

नंदुरबार – अतिक्रण हटाव मोहीम, मालमत्ता व संस्थावरील कर थकबाकीबाबत केलेली कारवाई बाबत चर्चेत राहिलेले नंदुरबार पालिकेचे तत्कालीन परीक्षाविधीन मुख्याधिकारी १२ जून पासून पुन्हा नंदुरबारात येत आहेत. यावेळी नंदुरबार तहसीलदारपदी एका महिन्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार महसूलमध्ये ते आता कशी कामगिरी करतात याकडे नंदुरबार तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेले परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पुलकित सिंग यांनी केलेल्या दबंग कामगिरीमुळे ते चर्चेत राहिले. यात त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शहरातील मुख्य रस्ते मोकळे केले. कोणताही राजकीय दबाव न ठेवता त्यांनी केलेली या कारवाईचे सर्वानीच स्वागत केले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कर थकवलेल्या मालमत्ता धाकरकांच्या दुकाना सील ठोकण्याचे काम करून त्यांनी पालिकेच्या तिजोरीत दोन ते अडीच कोटीचा महसून मिळवून दिला. त्यांच्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणतात असताना त्यांचा या पदाचा एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार मुख्याधिकारी पदाचा परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुलकित सिंग यांची अक्कलकुव्यात गटविकास अधिकारी म्हणून महिन्याभरासाठी नियुक्ती करण्यात आली. याठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. गटविकास अधिकारी म्हणून काम पाहतांना श्री.सिंग यांनी आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी केंद्रांसह अनेक विभागांना अचानकपणे भेटू देऊन आढावा घेत सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत का? याची तपासणी केली. या ठिकाणी महिनाभरात त्यांनी आपल्या आयएएस दर्जाचे अधिकारी काय काम करू शकतात हे दाखवून दिले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अक्कलकुवा गटविकास अधिकारी पदाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना श्री.सिंग यांची पुन्हा नंदुरबारात नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक महसूल विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुलकित सिंग यांची नंदुरबार तहसीलदारपदी नियुक्ती केली आहे. श्री.सिंग हे परीक्षाविधीन तहसीलदार म्हणून १२ जून रोजी आपला पदभार स्वीकारतील. १२ जून ते १४ जुलै असा एक महिन्याचा त्यांचा कार्यकाळ असून या काळात ते नंदुरबार महसूलमध्ये कशी कामगिरी करतात याकडे संपूर्ण जिल्ह्यचे लक्ष असणार आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here