कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या : अर्ध्यावरती डाव मोडला … अधुरी एक कहाणी ..

0
251

नंदुरबार -२/४/२०२३

नापिकी व त्यात बँकांचा कर्जाचा तगादा यामुळे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असलेल्या नगाव (भालेर ) येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.

नंदुरबार तालुक्यातील नगाव येथील रहिवासी संजय साहेबराव पाटील ( वय ५० ) यांचे अक्राळे शिवारात शेत आहे.

पत्नी, एक मुलगा व सून असा त्यांचा परिवार असून शेती व मजुरी करून ते कुटुंबाचा गाडा चालवित होते. खरीप हंगामात झालेल्या अत्यल्प पावसात त्यांना उत्पन्न आले नाही. त्यातच बँकेकडून पीककर्ज म्हणून ८० हजार रुपये घेतले होते.

तसेच ठिबक सिंचनासाठी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते.

मात्र खरीप हंगामात खर्च वजा जाता उत्पन्न आले नाही.

त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत संजय पाटील हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. सद्या त्यांनी काही क्षेत्रात मका लावला होता.यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तर सद्या मार्च एंडिंग मुळे बँकेकडून कर्ज फेडण्यासाठी तगादा सुरू होता. त्यामुळे संजय पाटील यांनी गावातील काही लोकांकडून उसनवार पैसे घेऊन ८० हजार पीककर्ज नुकतेच बँकेत भरल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. यावर्षी उत्पन्न आले नाही,

नापिकीमुळे बँकेचे उर्वरित कर्ज कसे फेडणार, पीक कर्ज फेडण्यासाठी गावातील लोकांकडून घेतलेले पैसे कसे परत करावेत? या विवंचनेत संजय पाटील हे गेल्या काही दिवसांपासून जेवण देखील घेत नव्हते.
दरम्यान, काल ३१ मार्च रोजी रात्री संजय पाटील हे अक्राळे शिवारातील शेतात मकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

पहाटे चार वाजता ते घरी आले व ओट्यावर असलेल्या खाटेवर झोपले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास वडील आले की नाही हे पाहण्यासाठी मुलगा भाऊसाहेब हा बाहेर आला असता खाटेवर झोपलेले वडील संजय पाटील यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांना दिसले.

याबाबत विचारणा केली असता नापिकीमुळे उत्पन्न आले नाही, बँकेचे कर्ज व इतर कर्ज फेडणार कसे ? यामुळे मी पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचे संजय पाटील यांनी मुलगा भाऊसाहेब व पत्नी मंगलबाई यांना सांगितले.

त्यामुळे तातडीने त्यांना नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगितले.

भाऊसाहेब पाटील याने संजय पाटील यांना जिल्हारुग्णालयात दाखल केले.

याठिकाणी कर्तव्यावरील डॉक्टर संजय पटले यांनी ८.२५ वाजता उपचारादरम्यान संजय पाटील यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले.

याबाबत भाऊसाहेब पाटील यांच्या खबरीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
तर याबाबत नंदुरबार तहसीलदार यांना माहिती देण्यात आली आहे.
संजय पाटील यांच्यावर दुपारी २ वाजता नगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. या घटनेने नगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या आत्महत्येने गाव सुन्न झालं आणि शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली ..

परंतु जीवनाचा डाव अर्ध्यावरती मोडला ..

आणि आयुष्याची कहाणी अधुरी राहिली …

जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here