बेमुदत संपातून जुन्या पेन्शन लागू करण्याची मागणी

0
489

शहादा : १४/३/२०२३

14 मार्च 2023 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला होता..

त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी संपात सुरुवात झाली.. शहादा शहरात देखील समन्वय समिती संघटनेने संपात सहभाग घेतला

महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर 2005 रोजी आणि नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संपास सुरुवात झाल्याच पहावयास मिळालं..

महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन संघटना समन्वय समिती घटक संघटना असल्याने सदर बेमुदत संपात सर्व शासकीय कर्मचारी सक्रिय सहभागी झाल्याचे पहावयास मिळालं..

महाराष्ट्र व्यतिरिक्त भारतातील इतर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तेथील सरकार पाठिंबा देत आहे..

मात्र महाराष्ट्रात राज्य सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याची भावना सरकारी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली..

या संपात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती शहादा शाखेनं संपास सुरुवात केली..

एकच मिशन जुनी पेन्शन ही घोषणा संपात ऐकू येत होती..

शहादा पंचायत समितीच्या आवारात शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यात महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

832023 7
01

बेमुदत संपात मोठ्या संख्येने पाठिंबा मिळणार असल्याची माहिती समोर येते..

या संपाला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

पंचायत समितीच्या आवारात संप सुरू असल्याकारण चक्क शहादा गटविकास अधिकारी यांनी आपल्या कार्यालयाचे झालं स्वतः उघडून आत जाऊन आपल्या टेबल खुर्चीची साफसफाई केली..

त्यामुळे जुनी पेन्शन पूर्ववत लागू करा या प्रमुख मागणीला समोर ठेवून सदर संप सुरू आहे..

लवकरात लवकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ यांच्या समन्वय साधून योग्य तो तोडगा भविष्यात निघेल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळेल हीच अपेक्षा..

या संपाचा पंचायत समितीतून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय मोहिते यांनी..
संजय मोहिते शहादा प्रतिनिधी एमडी टीव्ही न्यूज शहादा..

sanjay mohite

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here