शिंदखेडा -६/३/२०२३
निवडक उद्योगपतींना केंद्र सरकार पाठीशी घालतंय त्यात बडे उद्योगपती अदानी समूह यांना विशेष टार्गेट काँग्रेसने केलं .. त्या विरोधात निदर्शने करण्यात आली..
VIDEO
हे हि पहा: शिंदखेडा | अवकाळी पावसाने मका गहू भुईसपाट…! तालुका काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्टेट बँकेच्या समोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.. भाजपा आणि अदानी समूहा विरोधात घोषणाबाजी केली.. या समूहामध्ये एलआयसी भारतीय स्टेट बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यावधी रुपये गुंतवण्यास भाग पाडले आहे.. स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांना पैसे परत मिळतील का अशी भीती आता निर्माण होऊ घातली आहे.. काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नसून उद्योगपतींना देखील नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात येत आहे यासाठी विरोध आहे तसेच तात्काळ संसदीय समितीमार्फत चौकशी करावी सत्य समोर आणावं असं देखील त्यांनी म्हटलं.. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांना निवेदन दिल.. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर ,अनंत पवार ,सुनील चौधरी ,दीपक अहिरे, शामकांत पाटील ,डॉक्टर कुरेशी प्रकाश पाटील ,दीपक देसले, अशोक बोरसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. . भविष्यात चौकशी समिती न नेमल्यास तीव्र स्वरूपात जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला..यादवराव सावंत प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज शिंदखेडा