नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे

0
948

मोदी सरकारची ९ वर्ष ; खा.डॉ.हिना गावितांनी मांडला लोकसभा मतदार संघातील कामांचा आढावा

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघात सन २०१४ ते २०२२ या काळात कोटयावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. आगामी काळात जिल्हयात १० हजार ५ कोटी रुपयांचे २७७.८९ किमीचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाचे कामे प्रस्तावित आहेत. नंदुरबार येथे क्रिटीकेअर हॉस्पीटलला मंजूरी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सार्वजनिक आरोग्य शाळा उभारणे, जिल्ह्यात एक सैनिकी शाळा मंजूर करणे, जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कसाठी प्रयत्न, नंदुरबार येथे केंद्रिय विद्यालय, नंदुरबार येथे पासपोर्ट कार्यालय आदी कामे प्रस्तावित असल्याची माहिती माहिती खासदार डॉ.हिना गावित यांनी दिली.

मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. आपापल्या मतदार संघातील विकास कामांचा आढावा भाजपातर्फे मांडण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आज नंदुरबार लोकसभा मतदार संघातील विकास कामांची माहिती खा.डॉ.हिना गावित यांनी माध्यमांना दिली. त्या म्हणाल्या की, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सन २०१४ पासून २०२२ पर्यंत यापुर्वी कधीही झालेेली नव्हती, एवढी कामे पूर्ण झाली आहेत. शहरी भागात २६ तर ग्रामीण भागात ४३ अशा ६९ मोबाईल टॉवर्सला मंजुरी देण्यात आली असून नव्याने एकूण १४० टॉवर्सला मंजुरी मिळाली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

रेडीओ एफएम सुरु करण्यात आले आहे. अक्कलकुवा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात नव्याने रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार रेल्वेस्थानक इमारतीच्या नूतनीकरणासाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला प्रतीक्षालय, बैठक हॉलचे बांधकाम, सीएमआय ऑफिस, पार्सल ऑफिस बांधकाम, वाढीव बोगद्याचे बांधकाम, दिव्यांगांसाठी नवीन शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचा:

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS

महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS

जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS

नंदुरबार जिल्ह्यातील ३६ गावांना ४७९ कोटी ८६ लाख ९४ हजार ३९१ रुपये मंजूर करण्यात आले आहे. साक्री व शिरपूर तालुक्यातील पाच गावांना ४ हजार ८३९ कोटी ४१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात मतदार संघात ११६५ गावांमध्ये ९१८ कोटी ९४ लाख मंजूर करण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी १ लाख २२ हजार २५ शेतकर्‍यांना वाटप करण्यात आला आहे. १ लाख ९ हजार ४६२ शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले असून यासाठी ३२६ कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार ७१७ जनधन खाते उघडण्यात आले आहेत. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १ लाख ३७ हजार ८६३ खाते उघडण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार ९१७ खाते उघडण्यात आले आहेत. अटल पेन्शन योजनेअंतर्गत ३५ हजार १९८ खाते उघडण्यात आले आहेत. याशिवाय १७३३ सोलर योजनांसाठी २३९ कोटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.मुद्रा लोनमधून ३० हजार ९७५ लोकांना ११७ कोटी ४७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार लोकसभा मतदार संघात सन २०१४ ते २०२२ या काळात ५०० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-नंदुरबार-विसरवाडी-साक्री-पिंपळनेर राष्ट्रीय महामार्ग (५०.२० किमी), २१० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-शहाद-नंदुरबार-विसरवाडी-साक्री-पिंपळनेर (२१ किमी), १७५ कोटी रुपयंच्या राष्ट्रीय महामार्ग शेवाळी-निजामपूर-छडवेल-नंदुरबार-तळोदा-अक्कलकुवा ते गुजरात सिमाा, शेवाळी फाटा ते कळंभीर, निजामपूर महामार्ग (१६.६९ किमी), ९ हजार १२० कोटी रुपये खर्चाचा धुळे-वडोदरा, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील सोनगीर पासून ते वडफळी ता.अक्कलकुवा (सोनगीर-चिमठाणे-दोंडाईचा सारंगखेडा-शहादा-फत्तेपूर-दरा मोलगी-पिंपळखुटा-वडफळी व मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत (१९० किमी) या रस्त्यांचा समावेश आहे.

हे सुध्दा वाचा:

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS

महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS

जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील १४ रस्त्यांसाठी ११० कोटी १७ लाख ११ हजार, तळोदा तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी १८ कोटी ३० लाख ६ हजार, नवापूर तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी २१ कोटी ९४ लाख ७१ हजार , नंदुरबार तालुक्यातील ६ रस्त्यांसाठी १९ कोटी ९२ लाख ७७ हजार, शहादा तालुक्यातील नऊ रस्त्यांसाठी २८ कोटी ४ लाख ७३ हजार, साक्री तालुक्यातील चार रस्त्यांसाठी २४ कोटी १९ लाख १४ हजार, शिरपूर तालुक्यातील चार रस्त्यांसाठी १९ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४ ते १६ या कालावधीत ४७ हजार ६४७ घरकुले मंजूर झाले असून यासाठी ४५२ कोटी ६४ लाख ६५ हजार, सन २०१६ ते २२ दरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार ५४७ घरकुल मंजूर झाले असून १९७४ कोटी ५६ लाख ४० हजार रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे.

जिल्ह्यातील चार ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलसाठी १२४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शासकीय महाविद्यालयाला १९५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही डॉ.गावित म्हणाल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, राजेंद्र गावित उपस्थित होते.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here