धडगाव :- सहा महिन्यांपूर्वी धडगांव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापाडा येथील अंगणवाडी सेविका अलकाबाई अमिताभ वळवी यांच्या आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भात धडगाव येथील प्रकल्प बालविकास अधिकारी यांच्यावर म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु अद्यापही या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने व तीन वर्षापासून अंगणवाडी सेविकेला बिनपगारी राबविण्यात भाग पाडले असून सदरील महिलेलाला तीन वर्षाच्या पगार देण्यात यावा व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अटक करण्यात यावी व निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद नंदुरबार येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सहा महीने उलटुन ही सदर अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही झालेली नाही. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त तर नाही ना ? सर्वसामान्य माणसांनी न्यायतरी कुठुन मागावा असा प्रश्न याठीकाणी निर्माण होत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. धडगाव तालुक्यातील तेलखेडी गावाची अंगणवाडी सेविका तिसरे अपत्य असतानाही नियुक्ती करण्यात आली ती रद्द करण्यात यावे, धडगाव तालुक्यातील सेलबारा येथील अंगणवाडी सेविका दुसऱ्या तालुक्यात वास्तवास आहे. पाच वर्षापासून अंगणवाडी बंद असून फेर जाहिराती काढण्यात यावी.
जुगणीचा हिरिचापडा अंगणवाडी सेविका आत्महत्या प्रकरणी प्रकल्प बालविकास अधिकारी किशोर पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात यावी व निलंबित करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
-गोपाल पावरा. एम.डी.टी.व्ही. न्युज धडगांव