धडगांव :- दुचाकीची पिकपला जबर धडक, निगदीचा युवक ठार..

0
1362
Dhadgaon two-wheeler collided with pick-up, Nigdi youth killed..

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पिकअपला जबर धडक दिल्याची घटना धडगांव तालुक्यातील काकडदा येथे बुधवार, ४ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सचिन रंगल्या पवार (१९) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत नंदुरबार शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp Image 2023 10 05 at 2.57.53 PM 1
WhatsApp Image 2023 10 05 at 2.57.57 PM 1

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, निगदी येथील सचिन पवार (१९) हा तरुण बुधवार, ४ रोजी शहादाकडे दुचाकी क्रमांक (एम.एच ३९ ए.जी ३९८६) ने भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, काकडदा येथे सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या पिकअपला क्रमांक (एम.एच. ११ ए.जी. ३१३०) जबर धडक दिली.

WhatsApp Image 2023 10 05 at 2.58.01 PM 1
WhatsApp Image 2023 10 05 at 2.58.01 PM
WhatsApp Image 2023 10 05 at 2.58.00 PM
मयत तरुणाचा फोटो

यात दुचाकीवरील तरुण रस्त्यावर फेकला गेल्याने डोक्याला जबर मार लागला. अपघाताचा आवाज येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तरुणाला तात्काळ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने लागलीच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, तरुणाचा अपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने निगदी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

MD TV न्यूज धडगांव प्रतिनिधी गोपाल पावरा..

WhatsApp Image 2023 10 05 at 2.57.57 PM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here