धंगाई देवी यात्रा महोत्सव दि. 04 व 05 एप्रिल रोजी होणार..

0
193

नंदुरबार /साक्री -३१/३/२३

तालुक्यातील पिंपळनेर व सामोडे जवळील धंगाई देवी यात्रा महोत्सव दिनांक 04 व 05 एप्रिल 2023 रोजी श्री दुर्गासप्तशती पाठ वाचन व स्वच्छता अभियान तसेच श्री दुर्गासप्तशती पाठ हवन होणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्तनगर सामोडे, पिंपळनेर व कुलस्वामिनी धंगाई देवी मंदिर समिती यांच्या संयुक्त उपक्रमातुन तालुका साक्री जिल्हा धुळे येथे गुरूमाऊली व दादासाहेब यांच्या कृपाआशिर्वादाने ग्राम अभियान दिनांक 04 एप्रिल 2023 वार मंगळवार कुलस्वामिनी श्री धंगाई माता मंदीरात श्री दुर्गासप्तशती पाठ वाचन सेवा वेळ दुपारी 1.30 वा. मंदिर व परिसर स्वच्छता अभियान करणार आहेत.

तसेच दिनांक 05 एप्रिल 2023 वार बुधवार रोजी श्री दुर्गासप्तशती पाठ हवनयुक्त सेवा वेळ सकाळी 8.30 वाजेला होणार ह्या सेवेसाठी परिसरातील भाविक भक्तांना तसेच सर्व कुळभक्तानां जाहिर आव्हान करण्यात येते की प्रत्येक कुटूंबाने या सेवेत सहभागी व्हावे.

व ज्यांना या सेवेत सहभाग घेण्यास इच्छा असेल त्यांनी डॉ. विवेकानंद शिंदे 94239 41488 , डॉ. मिना विवेकानंद शिंदे 75592 57062 संपर्क करावा.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here