धुळे: माजी मंत्री व खान्देशातील जेष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यात ६ हजार २७० तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
धुळे जिल्ह्यातील युवक – युवतींना रोजगार मिळावा आणि त्यांच्या जीवनाला दिशा मिळावी म्हणून खान्देश नेते रोहिदास दाजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मेळाव्याला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण ८ हजार ७७६ जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकूण ६ हजार २७० जणांची निवड होऊन रोजगाराची संधी मिळाली आहे. त्यात ३ हजार ८८० जणांची निवड करुन जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तर मुलाखतीच्या पहिल्या फेरीत २ हजार ३९० जणांची निवड झाली आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीमार्फत बोलवून अंतिम मुलाखतीतून निवड केली जाणार आहे. तसेच ज्या युवक युवतींची निवड झाली नाही त्यांना जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टमार्फत मुलाखतीचे तंत्र, व्यक्तीमत्व विकास अशा विषयांवर मार्गदर्शन शिबीर घेवून पुढील रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी दिली जाणार आहे. तब्बल ६ हजार २७० जणांना या मेळाव्यामुळे नोकरी मिळाल्याचे खरे समाधान या रोजगार मेळाव्यामुळे मिळाले. यापुढेही बेरोजगारी निर्मूलनासाठी रोजगार मेळावे घेतले जातील. मात्र युवक युवतींनी शिक्षणाची कास धरुन आत्मविश्वासाने जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले.
दिलीप साळुंखे. एमडी. टीव्ही. न्युज धुळे ग्रामीण.