Dhule Accident News – कंटेनरचालकाच्या चुकामुळे धुळ्याजवळ लक्झरी बसचा अपघात
पुण्याहून गोरखपूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या आसपास मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा ते शिरपूरदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात बस रस्त्याच्या बाजूला पडल्याने २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
अपघाताची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी तात्काळ नरडाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये 10 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. जखमींच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.
नरडाणा पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन बेंद्रे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी आठ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील जुन्या नरडाणा टोल प्लाझा येथे हा अपघात झाला. लक्झरी बस चालकाने समोरील कंटेनर ट्रकची टक्कर टाळण्यासाठी बस डावीकडे खेचण्याचा प्रयत्न केला. कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने बस चालकाला टक्कर टाळण्यासाठी बाजूला वळावे लागले. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पडली.
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून कंटेनर ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.